एका अल्पवयीन मुलीची आर्थिक फसवणूक करण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एका अल्पवयीन मुलीची आर्थिक फसवणूक करण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2020 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान एका अल्पवयीन मुलीस साद दिलावर शेख रा. नकाशपुरा, गुरुवार पेठ, सातारा याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून 1 लाख 10 हजार 500 रुपये किमतीच्या वस्तू घेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी साद शेख याच्यावर आर्थिक फसवणुकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.