maharashtra

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा


अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शाहू चौक ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या गुरुवार बाग येथील पाण्याच्या टाकीजवळ रमेश गोपाळ देशमुख राहणार जकातवाडी, ता. सातारा यांच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या कार क्रमांक एमएच 14 एफएस 4613 वरील चालक विकास जाधव रा. क्षेत्र माहुली, सातारा याने समोरासमोर जोराची धडक दिली. त्यामुळे रमेश देशमुख आणि त्यांचा मित्र विक्रम नारायण सणस हे दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.