भुईंज पोलिसांच्या हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एकाला अटक करण्यात भुईंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आकाश चंद्रकांत साबळे, वय २४, रा. पळसमंडल, ता. माळशिरस, जि. सोलापूर असे त्याचे नाव आहे.
सातारा : भुईंज पोलिसांच्या हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एकाला अटक करण्यात भुईंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आकाश चंद्रकांत साबळे, वय २४, रा. पळसमंडल, ता. माळशिरस, जि. सोलापूर असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले होते. तपास पथकाने अपहरण झालेल्या मुलीचे नातेवाइक व परिसरातील साक्षीदार यांच्याकडे तपास केल्यानंतर दि.१८ नोव्हेंबर रोजी या अपहरण प्रकरणातील आकाश चंद्रकांत साबळे हा पळसमंडल येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी तात्काळ तपास पथक पाठवून त्याला व अपहरण झालेल्या मुलीला तपास पथकाने ताब्यात घेतले.