भुईंज येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : भुईंज येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान विजयनगर, भुईंज, तालुका वाई गावच्या हद्दीतून राहत्या घरातून साक्षी अंकुश मासाळ वय 15 हिचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार सोनाली अंकुश मासाळ वय 32, राहणार विजय नगर, भुईंज, तालुका वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एम. एम. तोडरमल करीत आहेत.