maharashtra

महाविद्यालयातील युवतीवर अत्याचार


Atrocities on a college girl
महाविद्यालयातील सतरा वर्षीय तरुणीवर एका युवकाने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सातारा शहरात उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला तत्काळ ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपी हा सतरा वर्षाचा असून तो कोरेगाव तालुक्यातील राहणार आहे. याबाबच्या गुन्ह्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : महाविद्यालयातील सतरा वर्षीय तरुणीवर एका युवकाने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सातारा शहरात उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला तत्काळ ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपी हा सतरा वर्षाचा असून तो कोरेगाव तालुक्यातील राहणार आहे. याबाबच्या गुन्ह्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनमधून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने पीडित मुलीशी तिची मैत्रीण बोलतेय, असे भासवून चॅटींग केले. पीडित मुलीला वाटले तिची मैत्रीणच तिच्याशी चॅटींग करत आहे. त्यामुळे ती सुद्धा बिनधास्तपणे चॅटींग करु लागली. मात्र, काही दिवसांनी आपल्याशी चॅटिंग करणारी ही मैत्रीण नसून मुलगा आहे, हे तिला समजले. त्यावेळी त्या तरुणाने पीडीत तरुणीला धमकी देऊन प्रेम संबंधाचे मेसेज पाठवायला भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिला एके दिवशी राजवाड्यावरील बसस्थानकात बोलावून घेतले. तिला दुचाकीवरून शाहूपुरी परिसरातील दिव्यानगरीतील एका खोलीत नेले. या ठिकाणी त्याने तुझे कॉल रेकॉर्ड तुझ्या घरच्यांना दाखवीन, असे ब्लॅकमेल करून तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर संशयित युवकाकडून वारंवार त्रास सुरू झाल्याने तिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना प्रत्यक्ष भेटून आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर घोडके यांनी तत्काळ संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये संशयित युवकावर गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.