अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 ऑगस्ट रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास आरशिया जाकीर शेख वय 17, राहणार गुरुवार पेठ, तालुका सातारा हिचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद फातिमा जाकीर शेख वय 49 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.