सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी
खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा विकासकामांचा धडाका
खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
फलटण : खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघातील करमाळा, सांगोला, माळशिरस, माढा या तालुक्यांनाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी तसेच या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, बौद्ध विहार बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे, दलित वस्तीमध्ये सभा मंडप बांधणे, दलित वस्ती कडे जाणारे रस्ते घेणे या शीर्षकाखाली निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी, गोखळी, ,गुणवरे, कोळकी, सासवड, हिंगणगाव, बरड, जावली, निंबळक, पाडेगाव, सोमंथळी, उपळवे, गिरवी, ढवळ, ताथवडा, गराडेवाडी तालुका माण, दहिवडी शहर तालुका माण असे एकूण १कोटी ५९ लाख रुपये व माढा लोकसभा मतदारसंघातील अजनाळे, कडलास, कोळा, जुनोनी, सोनंद, नाझरे, भाळवणी, कुर्डवाडी, तांबवे तालुका माढा, अकोले खुर्द माढा, अकोले बुद्रुक वडोली ता.माढा, अकलूज चौक, ता.माळशिरस, महाळुंग ता माळशिरस, नातेपुते पानीव माळीनगर, बिजवडी वीट तालुका करमाळा, जिंती तालुका करमाळा, जिंती तालुका करमाळा, कोळगाव तालुका करमाळा, पांगरे तालुका करमाळा, जेऊर तालुका करमाळा, दहिगाव तालुका करमाळा, हिंगणी तालुका करमाळा, एकतपुर तालुका सांगोला असे २ कोटी ४१ लाख दोन्ही जिल्हा एकत्रित ४ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे या भागातील छोटी-मोठी कामे होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.