लोणंद पोलीस ठाणे हद्दीत तोतया पोलीसगिरी करणाऱ्या एका भामट्यास लोणंद पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सातारा : लोणंद पोलीस ठाणे हद्दीत तोतया पोलीसगिरी करणाऱ्या एका भामट्यास लोणंद पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 ऑक्टोबर रोजी लोणंद पोलिसांना लोणंद-फलटण मार्गावर एक तोतया पोलीस वाहनधारकांना अडवत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन तपासणी केली असता विशाल रामचंद्र यादव वय 32 रा. तरड, ता. फलटण हा पोलिसांचा हाफ गणवेश करून वुलन जर्सीवर म. पो. असा सिम्बॉल लावून, खाकी पॅन्ट व काळा बूट परिधान करून, वाहने अडवून वाहनधारकांना तुमच्याकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तुमच्याविरुद्ध केस करण्यात येईल, असे म्हणून पैसे उकळीत असताना सापडला. त्याच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.