maharashtra

कराडात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट जनजागृती मोहीम

कराड शहर वाहतूक शाखेचा उपक्रम : सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांची संकल्पना

Helmet awareness campaign for two-wheelers in Karad
दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

कराड : दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
शहरात शनिवार 25 रोजी हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सायंकाळी ४ वाजल्यानंतर कोल्हापूर नाका येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच याप्रसंगी वाहतूक पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्याबाबत आवाहन केले.
शहर, जिल्ह्यासह देशभरात दिवसेंदिवस रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असून तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे. या अपघाताबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, दुचाकी स्वारांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, तसेच चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्टचा वापर करावा, वेगावर नियंत्रण ठेवावे, यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी सरोजिनी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूर नाका येथे गांधीगिरी पद्धतीने विशेष मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच उद्यापासून दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच वाहतुकीचे नियम पाळावेत, आदीबाबत या विशेष जनजागृती मोहिमेद्वारे आवाहन करण्यात आले. सदर मोहिमेत सपोनि सरोजिनी पाटील यांच्यासह कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.