maharashtra

जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत मतदान व मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत मतदान व मतमोजणी दिवशी कलम 36 लागू

सातारा जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत मतदान व मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज असून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुक नियमन, मिरवणूकीसाठी निर्बंध घातले आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत मतदान व मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज असून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुक नियमन, मिरवणूकीसाठी निर्बंध घातले आहेत. मिरवणूक मार्ग, मिरवणूकीतील व्यक्तीचे वर्तन व ध्वनीप्रदुषण याबाबत न्यायालयाने जी बंधने घालून दिली आहेत त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हयातील 319 ग्रामपंचायतींसाठी दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होत असून दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उपनिरीक्षक यांचेसह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान दिवस व दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी दिवस या कालावधीकरिता त्या-त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणुन वाहनांच्या नियमना संदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबधाने, मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने सर्वोच्च  न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देणेचे अधिकार प्रदान केले आहेत.