maharashtra

अवैध दारू विक्री प्रकरणी कराड पोलिसांचा सहा ठिकाणी छापा


अवैध दारू विक्री प्रकरणी कराड शहर आणि तालुका पोलिसांनी विविध सहा ठिकाणी छापे मारले असून सहा हजार सहाशे वीस रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

सातारा : अवैध दारू विक्री प्रकरणी कराड शहर आणि तालुका पोलिसांनी विविध सहा ठिकाणी छापे मारले असून सहा हजार सहाशे वीस रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंड, तालुका कराड गावात राहत्या घराच्या आडोशाला उघड्यावर मुकेश नानासो जाधव अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून पंधराशे रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत येळगांव तालुका कराड गावच्या हार्दिक राहत्या घराच्या आडोशाला भोसले हा दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 720 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत शेणोली स्टेशन येथे संदीप मारुती सूर्यवंशी वय 42 राहणार शेणोली याच्याकडून 720 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चौथ्या घटनेत साकुर्डी तालुका कराड गावच्या हद्दीत राजेंद्र बापूराव पाडेकर राहणार आरेवाडी, तालुका कराड यांच्याकडून अठराशे रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पाचव्या घटनेत वसंतगड तालुका कराड गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला परशुराम करीअप्पा कट्टमणी वय 4३ राहणार वसंतगड, तालुका कराड यांच्याकडून ९०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सहाव्या घटनेत कोपर्डे हवेली, तालुका कराड गावच्या हद्दीत समाधान बाजीराव चव्हाण राहणार कोपर्डे हवेली तालुका कराड यांच्याकडून 980 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.