अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अलंकृता विजय कांबळे हिने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तिहेरी यश मिळवले.
सातारा : अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अलंकृता विजय कांबळे हिने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तिहेरी यश मिळवले. तिने जिल्हा स्तरीय सर्धेत (कंपाऊंड प्रकारात) द्वितीय क्रमांक, विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. यानंतर अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांघिक कांस्य पदक पटकावले. तिच्या समवेत सिद्धी नागुलवार, रिया घोरपडे, श्रुतिका माळी यांनी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत सांघिक यश संपादन केले.
अलंकृता कांबळे पोलीस कर्मचारी विजय कांबळे यांची कन्या आहे. तिला पोलीस अंमलदार प्रवीण सावंत, शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, वेल्फेअर ए.पी.आय. वाळवेकर यांच्या सहकार्याने फरोख कूपर (कूपर इंड्ट्रीज) यांनी अलंकृता कांबळे हिला आर्थिक मदत करून तिच्या खेळास प्रोत्साहन दिले आहे. अलंकृता कांबळचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.