ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ते 25 फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने किन्हई, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत असलेल्या म्हारकी नावाच्या शिवारातील असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्याने तोडून त्यातील 28 हजार रुपये किंमतीची 70 किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेऊन ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल जमिनीवर सांडून नुकसान केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.