maharashtra

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई


अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी मध्यरात्री निलेश महादेव शेलार रा. आंबेघर, ता. जावली हा तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सी येथे रस्त्याच्या कडेला तोंडाला रुमाल बांधून आपला चेहरा झाकून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असलेला मिळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.