maharashtra

4 कोटी 5 लाख 27 हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात


इंदोली, ता. कराड येथील ग्राम विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करून 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांचा अपहार करणाऱ्या पतसंस्थेचा व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे, रा. इंदोली, ता. कराड याला उंब्रज येथे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

सातारा : इंदोली, ता. कराड येथील ग्राम विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करून 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांचा अपहार करणाऱ्या पतसंस्थेचा व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे, रा. इंदोली, ता. कराड याला उंब्रज येथे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यामधील सहभाग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी सातारा जिल्ह्यामधील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींना तातडीने शोधून अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने आपले शोध मोहीम सत्र गतिमान केले होते. : इंदोली, ता. कराड येथील ग्राम विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध 4 कोटी 5 लाख 27 हजार रुपयांच्या अपहाराचा गुन्हा उंब्रज पोलीस स्टेशन येथे जुलै 2022 मध्ये दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने सुरू होता.
या गुन्ह्यातील पतसंस्थेचा व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे, रा. इंदोली, ता. कराड हा उंब्रज येथे येणार असल्याची गोपनीय बातमी पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. तपासी अधिकारी शिवाजी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने पोरे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली सदर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार प्रमोद नलावडे मनोज जाधव संतोष राऊत शफिक शेख प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला होता.