कॉलनी फिल्म्स निर्मित व मूळचे वाईचे असणारे लेखक दिग्दर्शक निर्माता गणेश चव्हाण यांचा पहिलाच जिव्हारी नावाचा चित्रपट 20 मे रोजी येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याची माहिती चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : कॉलनी फिल्म्स निर्मित व मूळचे वाईचे असणारे लेखक दिग्दर्शक निर्माता गणेश चव्हाण यांचा पहिलाच जिव्हारी नावाचा चित्रपट 20 मे रोजी येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याची माहिती चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, साताऱ्यातील 81 कलाकारांना या चित्रपटांमध्ये संधी देण्यात आलेली आहे. जिव्हारी या चित्रपटाच्या माध्यमातून नाती आणि त्यावर भाष्य पारंपारिक मानसिकतेला छेद देणारा हा चित्रपट परिवर्तनाचा वेगळा संदेश देऊन जातो. हा चित्रपट साताऱ्यासह महाराष्ट्रातील 65 सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तसेच या चित्रपटाचे प्रदर्शन परदेशात ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा होणार आहे.
या पत्रकार परिषदेस दिग्दर्शक गणेश चव्हाण यांच्यासह अभिनेत्री निकिता कांबळे, अभिनेता सुयोग मोरे, मनिषा मोरे, राजुरीकर, अभिनेता ओंकार राजपूत, देवेंद्र देव, नितिन बनसोडे, मारुती माळी, प्रफुल्ल कांबळे आणि देव माणूस आजी रुक्मिणी सुतार यावेळी उपस्थित होते.
चित्रपटाच्या कॅमेरामन पदाची जबाबदारी संजय गुप्ता यांनी सांभाळली असून कला दिग्दर्शक सुरेश राजेंद्र हे आहेत. प्रशांत एनोल यांची वेशभूषा असून संगीत ऋषिकेश कुलकर्णी यांचे आहे. या चित्रपटातील गाणी आघाडीचे गायक आनंद शिंदे यांनी गायली आहेत. या चित्रपटाचा सातारकर रसिकांनी निश्चित आस्वाद घ्यावा, असे आवाहन गणेश चव्हाण यांनी केले आहे.