कराड-उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कराड : कराड-उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकी वरील इसम धोंडेवाडी येथील असून चंद्रकांत भोसले (वय 50) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करत असताना कराड कडे येणाऱ्या कराड आगाराच्या एसटीची धडक बसून दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघात कालेगावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या चौकात झाला आहे.