maharashtra

मेढा उपअभियंता यांच्या गाडीला अपघात


Accident to Medha Deputy Engineer's car
मेढा बाजार चौक येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खात्याचे उपअभियता इनामदार यांची गाडी रस्त्याच्या डीवायडर मध्ये घुसली आणि मोठा अपघात होत होता. त्यातून इनामदार वाचले.

मेढा : मेढा बाजार चौक येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खात्याचे उपअभियता इनामदार यांची गाडी रस्त्याच्या डीवायडर मध्ये घुसली आणि मोठा अपघात होत होता. त्यातून इनामदार वाचले.
रस्ते कामात आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था न केलेने जास्त अपघात होत आहेत. त्यात काहींना आपला प्राण गमवावे लागले, तर काहीना अतिशय मोठी दुखापत झाली आहे. मेढा येथील होणाऱ्या रस्त्याच्या कामाची दिरंगाई यावेळी स्वत: इनामदार यांनी अनुभवली. यातून ते रस्त्याच्या कामाचा स्पीड वाढवून पावसाळ्याच्या आधी मेढ्यातील रस्ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा मेढ्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत. संथ गतीने चालणाऱ्या कामावर मनसे संघटक अध्यक्ष माने आणि मनसैनिक बबन हिरवे यांनी जर पावसाळा अगोदर मेढ्यातील रस्त्याचे काम पूर्ण केले नाही तर मनसे स्टाइलने जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.