बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.
सातारा : बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 जानेवारी रोजी सहा वाजण्याच्या सुमारास अमित सुनील म्हेत्री वय 25, रा. संभाजीनगर, सातारा हा युवक सिटी पोस्ट ते हेम एजन्सी जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या ताब्यातील मोटरसायकल लोकांच्या जीवितास धोका होईल व वित्तहानी होईल तसेच रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने उभी केलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत उत्कर्ष मोहन पाटील वै 22 राहणार बोरकर तालुका सातारा हा त्याच्या ताब्यातील वाहन वेडेवाकडे, बेदरकारपणे, मानवी जीवितास धोका निर्माण होईल इतक्या भरधाव वेगाने चालवीत असलेला आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.