maharashtra

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोवई नाका ते आरटीओ ऑफिस जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या कुबेर विनायक मंदिराच्या पाठीमागील बाजूच्या आडोशाला विष्णू मोतीराम बनपट्टे रा. केसरकर पेठ, सातारा हा स्वतःचा चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.