ललगुण, ता.खटाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अभय जाकीर काळे (वय 19, रा. मोळ, ता. खटाव) याला पुसेगाव पोलिसांनी बुध येथे सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतले.
पुसेगाव : ललगुण, ता.खटाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अभय जाकीर काळे (वय 19, रा. मोळ, ता. खटाव) याला पुसेगाव पोलिसांनी बुध येथे सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी ही कारवाई करून अभय काळे यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ललगुण ता.खटाव येथील घरफोडी च्या गुन्ह्यातील चार हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी अभय काळे हा बुध ता. खटाव येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पुसेगाव पोलिसांनी येथे सापळा रचून संशयित हा शेतात पळून जात असताना पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. या आरोपीवर पुसेगाव, वडूज, कोरेगाव, वडगाव निंबाळकर, उरळीकांचन (जि. पुणे) येथील पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, हवालदार चंद्रकांत खाडे, आनंदा गंबरे, सचिन जगताप, सुनील अबदागिरी, पुष्कर जाधव, अशोक सरक, साहिल झारी, विपुल भोसले यांनी सहभाग घेतला. हवालदार दीपक बर्गे अधिक तपास करत आहेत.