maharashtra

कोर्टात हजर न राहणाऱ्या 17 आरोपींना अटक

सातारा शहर पोलिसांची कारवाई

कोर्ट केस कामांमध्ये गैरहजर राहून सहकार्य न करणाऱ्या 17 आरोपींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून वॉरंट प्राप्त आरोपींची माहिती कसोशीने प्राप्त करून शोध मोहिमाद्वारे त्यांना ताब्यात घेतले आहे.

सातारा : कोर्ट केस कामांमध्ये गैरहजर राहून सहकार्य न करणाऱ्या 17 आरोपींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून वॉरंट प्राप्त आरोपींची माहिती कसोशीने प्राप्त करून शोध मोहिमाद्वारे त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कोर्ट केसेस प्रकरणात हजर न राहणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सातारा शहर पोलिसांना दिल्या होत्या.

त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना प्राप्त वॉरंटी छाननी करण्यास सांगितले आणि त्यानुसार आरोपींची यादी बनवून पाच पथके शहराच्या वेगवेगळ्या भागात रवाना केली. या शोध मोहीम प्रक्रियेमध्ये 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

राहुल बाळकृष्ण बनसोडे वय 42 राहणार रविवार पेठ सातारा, स्वप्निल राहुल बनसोडे वय 26 राहणार 186 रविवार पेठ, संतोष अशोक पवार वय 33 राहणार क्षेत्र माहुली, अनिल बापूराव मोहिते वय 32 राहणार लक्ष्मी टेकडी, श्रीकांत मोहन गडांकूश वय 31 राहणार गोरखपूर पिरवाडी, प्रकाश किसन वायफळकर वय 58 राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा ,सुनील शिवाजी दळवी वय 35 राहणार माऊली बंगला काळेश्वरी कर्मवीर नगर, ईश्वर दत्ता सावंत वय 30 राहणार 826 शनिवार पेठ सातारा, प्रीतम प्रकाश महाडिक वय 35 राहणार नवीन एमआयडीसी सातारा,अक्षय राजेंद्र रसाळ वय 24 राहणार क्षेत्र माहुली सातारा, शुभांगी प्रकाश मुळे वय 37 कृष्णकुंज अपार्टमेंट गोडोली सातारा, मंदा हेमंत भोकरे वय 56 राहणार देशमुख कॉलनी करंजे सातारा, अक्षय लालासो पवार वय 26 राहणार खंडोबाचा माळ आणि इतर चार विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने संबंधितांच्या विरोधात वॉरंट काढले तर त्यांना अटक करून त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात येईल. संबंधितांनी कोर्टाच्या केस कामी दिलेल्या तारखेस हजर रहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

या कारवाईमध्ये संदीप मोरे, राजेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे,  सहाय्यक फौजदार एस. आर. दिघे, अरुण दगडे, विजय गायकवाड, राहुल गाडगे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अनिल सावंत, पंकज डहाणे, अभय साबळे, बाबा भिसे, निलेश घोडके, सागर गायकवाड, प्रमोद सोनवणे, सचिन देवकर, प्रल्हाद चिरफरे, राजू कांबळे, अंबादास काटे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ,  क्रांती निकम, धीरज जाधव, लक्ष्मीकांत तरडे, शर्मिला सावंत यांनी भाग घेतला होता.