maharashtra

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी


मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सोनगाव हद्दीतील हॉटेल शिवार च्या समोर रोहित सुनील मोरे रा. सोनगाव तर्फ, सातारा या युवकासह त्याचे मित्र शिवराज विश्वास नावडकर व पार्थ शेखर चिकणे यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून तेथीलच गणेश लक्ष्मण जाधव आणि उमेश लक्ष्मण जाधव यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याची तक्रार रोहित मोरे यांनी दाखल केली आहे.
तर गणेश लक्ष्मण जाधव राहणार सोनगाव तर्फ सातारा यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून तेथीलच रोहित सुनील मोरे, शिवराज विश्वास नावडकर, पार्थ शेखर चिकणे यांच्या विरोधात त्याला व त्याचा भाऊ उमेश याला दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.