maharashtra

मेढा मोहाट पुलावरून उडी टाकून वृद्धाची आत्महत्या; परिसरात खळबळ


ऐन दिवाळीत मेढा मोहाट पुलावरून अडीचच्या सुमारास एका वृद्धाने आत्महत्या केल्याचे वृत्त असून मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

मेढा : ऐन दिवाळीत मेढा मोहाट पुलावरून अडीचच्या सुमारास एका वृद्धाने आत्महत्या केल्याचे वृत्त असून मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, मेढा मोहाट पुलावर दुपारी अडीचच्या सुमारास एका वृद्धाने पुलावरून नदीच्या जलाशयात उडी मारून आत्महत्या केली. पुलाखाली मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी मेढा मोहाट पुलाजवळ धाव घेतली व चौकशी केली. वृद्धाने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या तळाशी गेल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली असून मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी महाबळेश्वर ट्रॅकर्सला पाचारण केले आहे. ट्रेकर्सची टीम उद्या सकाळी मेढा येथे पोहोचणार आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत वृद्धाने आत्महत्या केल्याने खळबळ निर्माण झाली असून अद्याप त्याचे नाव, पत्ता याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.