maharashtra

मेढा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त


मेढा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून बारा जणांवर कारवाई करत सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा : मेढा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून बारा जणांवर कारवाई करत सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत जाधव आळी येथील अमोल हनुमंत शिंदे यांच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला अमोल हनुमंत शिंदे वय 40, संजय शामराव दबडे वय 50, तुकाराम कोंडीबा कचरे वय 70 (तिघेही राहणार कुडाळ तालुका जावली), दत्तात्रय मारुती जांभळे वय 66, अशोक भानुदास जाधव वय 40, अतुल गौतम पाडागळे वय 36 (तिघेही राहणार भिवडी तालुका जावली), संपत नारायण बेलोशे वय 50, राहणार रुईघर, तालुका जावली, विजय धर्म शिर्के राहणार सोमवारी तालुका जावली हनुमंत वसंत महामुलकर राहणार दरे बुद्रुक तालुका जावली सचिन मोहन जाधव राहणार सोनगाव तालुका जावली विजय राजाराम धनावडे राहणार मेढा तालुका जावली रुपेश दीपक पवार राहणार उत्तरे तालुका वाई हे पैशावर जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार 932 किमतीचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.