maharashtra

मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सेंट पॉल स्कूल, सदर बझार, सातारा येथील ग्राउंडवर अज्ञात तीन ते चार इसमानी श्रीराम प्रताप सुळके वय 40, रा. संभाजीनगर, सातारा यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.