जिल्हा ओबीसी संघटनेचे साताऱ्यात धरणे आंदोलन
भाजपला ओबीसी प्रेमाचा खोटा पुळका जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांचा आरोप
इतर मागास प्रवर्गाच्या सर्व मागण्या माहीत असूनही ते मान्य न करण्याचे राजकारण भाजप करत आहे. त्यामुळे भाजपचा ओबीसी प्रेमाचा कळवळा खोटा असल्याचा आरोप सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केला.
सातारा : इतर मागास प्रवर्गाच्या सर्व मागण्या माहीत असूनही ते मान्य न करण्याचे राजकारण भाजप करत आहे. त्यामुळे भाजपचा ओबीसी प्रेमाचा कळवळा खोटा असल्याचा आरोप सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केला. जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, महासचिव प्रमोद शिरसागर, अक्षय कुरकुले आणि लोहार अशोक दीक्षित, डॉक्टर मकरंद पोटे, अशोक करंजी, नानासो गुरव, प्रकाश वेदपाठक, भरत कुंभार इत्यादी सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात करावी, विधानसभेमध्ये जो ठराव झाला त्या ठरावानुसार आपण सर्वपक्ष प्रतिनिधी बोलून पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यात यावी मात्र सध्या तसे घडत नाही. मंडल आयोगाच्या ओबीसी संदर्भातील शिफारशी स्वीकारण्यात येण्यासंदर्भात ही टाळाटाळ होत आहे. ओबीसींचा शासकीय व निमशासकीय नोकरी अनुशेष तात्काळ भरण्यात यावा. शिक्षक प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने त्वरित करण्यात यावी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द करून समान शिक्षण पद्धती लागू करावी, विषमतावादी शिक्षण रद्द करून भारत संविधानाच्या मुद्द्यावर समतावादी शिक्षण प्रणालीचे रचना करावी, इतर मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय करावे इत्यादी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भरत लोकरे म्हणाले, ओबीसींचा खरा अपमान भाजपच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकार अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये धडक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा ओबीसी संदर्भातील कळवळा हा अत्यंत खोटा आहे.