nagarpalika

esahas.com

घरपोच विक्री करण्यासाठी नगरपरिषदेमध्ये  दोन दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

सातारा शहरात घरपोच विक्रीकरीता भाजीपाला, किराणा माल, दुध, फळे विक्रेत्यांची प्रथम यादी सातारा नगरपरिषदेच्या फलकावर डकविण्यात आली असुन यादीमधील विक्रेत्यांनी घरपोच विक्रीचे परवाने सातारा नगरपरिषदेच्या कोरोना कक्षातून प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.

esahas.com

सातारा नगरपालिकेला लवकरच हद्दवाढ क्षेत्राचा निधी प्राप्त होईल

नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

सातारच्या उपनगराध्यक्ष पदासाठी 5 नोव्हेंबरला निवड

सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीत मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे.

esahas.com

जिल्हा प्रशासनाच्या विरोधात सोमवारी मूक मोर्चा

करोना संक्रमणाची वाढती दहशत व वारंवार वाढत जाणारा बळीचा आकडा यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाची रणनीती यशस्वी होताना दिसत नाही . जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवून त्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवारी दि 28  रोजी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा सुरक्षित अंतर पाळून काढण्यात येणार आहे, अशी माहिती नविआचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली.