मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!