coupleatsadarbazarattemptedselfimmolation

esahas.com

सदर बाजार येथील दांपत्याचा पालकमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही सातारा पोलिसांनी दाद दिली नाही. या कारणास्तव शुक्रवारी दुपारी सदर बाजार मधील लक्ष्मी प्रकाश डागा व प्रकाश डागा या दांम्पत्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.