thetwowerefinedrs20000eachforobstructinggovernmentwork

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना प्रत्येकी 20 हजार रुपये दंडाची शिक्षा

तलाठी किरण तानाजी पवार यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच पवार यांना मारहाण करुन शासकिय कामात अडथळा करणाऱ्या तसेच त्यांना धमकी दिल्याबद्दल तानाजी खाशाबा वलेकर (वय 38) व सचिन दादा राजगे (वय 35, दोघे रा. पिंपरी ता. माण) या दोघांना अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय काळे यांनी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड व दंड न भरलेस दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.