suspiciousdeathofoneandahalfyearolddaughteralongwithhusbandandwifeinwadgaon...!!

esahas.com

वडगाव येथील पती, पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू...!!

वडगाव हवेली (ता. कराड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा भुवनेश्वर, ओरीसा येथे मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली. संबंधितांचे मृतदेह गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. घातपात झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह जमावाने शुक्रवार दि. 29 रोजी रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलीस ठाण्यात आणून तेथेच ठिय्या मांडला. यावेळी जमाव आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.