माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!