सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे पाहत असताना आता राधिका रस्त्यावरील अतिक्रमणांकडे आता पाहुयात. राधिका रस्त्यावरील एका सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर काही धनिकांनी लोखंडी भक्कम गेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला आहे. याच रस्त्यावर दोन व्यावसायिकांनी ओढ्यावर बांधकामे करीत सरकारी नियमांना हरताळ फासण्याचे काम केले आहे.
सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे हा आजच्या घडीला गंभीर विषय ठरला आहे. या अतिक्रमणांमुळे बाहेरगावावरुन येणार्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मात्र जीव टांगणीला लागले आहेत. असे असले तरी पालिका-पोलीस प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरुन या परिस्थितीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विनित जवळकर यांनी घेतला आहे या परिसराचा धांडोळा.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!