उंबर्डे, ता. खटाव येथील एका विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी वडूजच्या वनविभागास दिल्यानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढून जीवदान देण्यात आले.
वडूज : उंबर्डे, ता. खटाव येथील एका विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी वडूजच्या वनविभागास दिल्यानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढून जीवदान देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंबर्डे (ता. खटाव) येथील संजय पवार यांच्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती धनाजी पवार यांनी फोन वरून वनविभागास दिली. दरम्यान, वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे बी. एस. जावीर, एस. बी. चव्हाण, महेश पाटोळे, गजानन देशमुख व इतर कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले.
यावेळी त्याठिकाणी असलेल्या पिंटू काळे (फौजी, काळेवाडी), राहुल पवार, गणेश पवार व इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने वनविभागाने त्या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढले. व त्याला वनक्षेत्रात सोडून दिले.


