wheredidthedevelopmentfundthatcametothedistrictgo

esahas.com

यापूर्वी जिल्ह्यात आलेला विकासनिधी गेला कुठे? : पालकमंत्री शंभुराज देसाई

मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणला पण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे. हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला, असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरीत्या राष्टवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना जबाबदार धरले आहे.