udayanrajejoinsdevendrafadnavisatsagarbungalow

esahas.com

सागर बंगल्यावर उदयनराजे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खलबते

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर उत्स्फूर्त भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. या भेटीमध्ये उदयनराजे यांनी फडणवीस यांच्या कुशल रणनीतीबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.