thievesrobbedgaspipeworkersonthehighwaywithknivesandaxes...!!

esahas.com

महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले...!!

मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे.