theroadtojamblegharwasstolen:districtshivsenachiefsachinmohite

esahas.com

जांभळेघर वस्तीचा रस्ता गेला चोरीला : जिल्हा शिवसेनाप्रमुख सचिन मोहिते

रोहोट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या जांभळेघर वस्ती ते घाटाई या दरम्यानचा अडीच किलोमीटर चा रस्ता ठेकेदाराने डांबरीकरण आणि खडीकरण न करताच त्याचे परस्पर अकरा लाख रुपयांचे बिल काढल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.