selectionofthreefromsatarfornationalwrestlingchampionship

esahas.com

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सातारच्या तिघांची निवड

कै. मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, (भोसरी) पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ज्युनियर फ्री स्टाईल मुले, ज्युनियर ग्रीको रोमन मुले व ज्युनियर फ्री स्टाईल मुली राज्यस्तरीय निवड चाचणीत सातारचे सुमित गुजर (खातगुण), महेश कुंभार (बुध) आणि साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.