searchforspaceforsatarakendriyavidyalayabegins

esahas.com

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केलेल्या मागणीला व त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू असून पर्यायी जागांची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी शासकीय अधिकाऱ्यांसोबत केली.