pusegaonjantacurfew

esahas.com

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुसेगावात आजपासून सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’

शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्‍यांसह तब्बल 51 जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने घेतला.