koregaonvikasmanch

esahas.com

कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय

‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची इतर कोणाशी तुलना करता येणार नाही,’ असे प्रतिपादन कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी केले.