happynewyearcelebration...athomethisyear...

esahas.com

हॅपी न्यू ईअर सेलिब्रेशन... यावर्षी घरच्या घरी...

हॅपी न्यू ईअर, इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशन देखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे स्वागत आप्तस्वकीयांबरोबरच करा. हा आनंद आपल्या आठवणीच्या गोड कूपीत जपून ठेवतांना काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या. अगदी असेही म्हणेण की, हॅपी न्यू ईअर साजरा करा पण घरच्या घरी.. कारण कोरोना अजून संपलेला नाही..