"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त" 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झंडा फडकेल. या हर घर झंडा उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यातील 5 शासकीय व 21 खाजगी असे एकूण 26 रुग्णालयामध्ये राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 हजार 900 पेक्षा जास्त कोविड-19 रुग्णांना उपचाराचा मोफत लाभ देण्यात आला आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 996 आजार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 231 असे एकूण 1209 आजारांवर उपचार केले जातात. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला.
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना "अर्थसहाय्य योजना" या योजनेंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेंतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.