childabductedfromsanglirescuedfromsatararailwaystation

esahas.com

सांगली येथून अपहरण केलेल्या बालकाची सातारा रेल्वे स्थानकातून सुटका

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी रेल्वेतून जाणाऱ्या चौघांना सातारा येथून अटक करत अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली आहे. रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने देवी सत्येंद्रदास सर्व रा. बिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.