aschoolboywhowentforaswiminshirwadedrownedanddied...!!

esahas.com

शिरवडेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू...!!

शिरवडे ता. कराड येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय १४) त्याचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच शिरवडे गावावर शोककळा पसरली.