गणेशोत्सव म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता उत्सव. पण कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर विरजण पडल्याचे चित्र दिसत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की, बाप्पांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावता येतील की नाही याची खात्री देखील व्यावसायिकांना नाही. यामुळे पुसेगाव, ता. खटाव येथील गेली अनेकवर्ष सिझनल व्यवसाय करणार्या काही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी हताश न होता बाप्पांच्या मूर्तीची ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुसेगाव : गणेशोत्सव म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता उत्सव. पण कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर विरजण पडल्याचे चित्र दिसत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की, बाप्पांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावता येतील की नाही याची खात्री देखील व्यावसायिकांना नाही. यामुळे पुसेगाव, ता. खटाव येथील गेली अनेकवर्ष सिझनल व्यवसाय करणार्या काही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी हताश न होता बाप्पांच्या मूर्तीची ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या बाप्पाची वेगवेगळी रूपे व्हॉट्सअॅप, पीडीएफ फाईलद्वारे ग्राहकांना पाठवून ऑनलाईन बुकिंग केली जात आहे.
दरम्यान, ऑनलाईन गणपतींचे बुकिंग सुरू करून घरपोच गणेश मूर्ती पोहोचवण्याचा पर्याय व्यावसायिकांनी निवडल्याने सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर गणेशमूर्ती विक्रीच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. या जाहिरातींना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आधीच काही दिवस आपली आवडणारी मूर्ती आरक्षित करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन बुकिंग करत असल्याची माहिती गणेशमूर्ती विक्रेते रमाकांत नलावडे यांनी दिली.
दरवर्षी घरोघरी तीन ते चार फुटांपर्यंतच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक टंचाईचा विचार करून, बहुतांशी भाविक लहान मूर्तींची बुकिंग करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.