दहिवडी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत


दहिवडी, ता. माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज, दहिवडीच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत यांची निवड करण्यात आली आहे.

बिजवडी : दहिवडी, ता. माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज, दहिवडीच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत यांची निवड करण्यात आली आहे.
कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांची सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे बदली झाल्यानंतर संस्थेने डॉ. बी. एस. बळवंत यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली आहे.
रयत शिक्षण संस्थेत 28 वर्ष अध्यापन, संशोधन, महाविद्यालयीन प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. बळवंत यांनी कॉलेजमध्ये हिंदी विभागप्रमुख,  उपप्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला आहे. 
पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. बळवंत म्हणाले, ‘प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती दिल्याबद्दल संस्था पदाधिकार्‍यांचा आभारी आहे. संस्थेच्या ध्येय, धोरणानुसार संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सहकार्‍यांच्या साथीने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कॉलेजला सर्व स्तरांवर प्रगतिपथावर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.’
डॉ. बळवंत यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, जनरल बॉडी सदस्य डॉ. प्रदीपकुमार शिंदे, नीलिमा पोळ, संस्था पदाधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, विविध संस्थांचे पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.